@माण बाजार समिती बैठकी बाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली
@उद्या पुन्हा नव्याने सभा
@बाजार समिती सभापती निवडणूक नाट्यमय वळणाव
दहिवडी: भरारी वृत्तसेवा
माण तालुका कृषी
उत्पन्न बाजार समितीची सभापती निवडीबाबतची बैठक अन्यायकारक पद्धतीने तहकूब करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालकांनी कोल्हापूर खंडपिटाकडे केली होती. न्यायालयाने १८ पैकी ९ पेक्षा जास्त सदस्यांची उपस्थिती आवश्यक असल्याच्या निर्वाळा देत याचिका फेटाळली व
तहकूब झालेली बैठक पुन्हा नव्याने घेण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार उद्या बाजार समिती ची सभा पुन्हा होणार आहे.
- माण बाजार समितीत भाजप आणि रासप यांच्या युतीची सत्ता आहे. त्यांच्याकडे नऊ संचालक आहेत.विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे ही नऊ सदस्य आहेत. बाजार समितीचे सभापती विलास देशमुख यांनी इतरांना संधी मिळावी या कारणास्तव राजीनामा दिला त्यानंतर
दि. १३ ऑक्टोबर रोजी सभापती निवडीसाठी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ सदस्य हजर होते.अध्याशी अधिकाऱ्यांनी ९ पेक्षा अधिक सदस्य हजर असण्याच्या नियमाला अधिन राहून कोरम अभावी सभा तहकूब केली होती.यावर मोठ्या प्रमाणावर वादंग झाला होता.१३ ऑक्टोबर रोजी झालेली बैठक ग्राह्य धरण्यात यावी अशी मागणी विरोधी राष्ट्रवादीच्या गटाकडून करण्यात आली होती.अध्याशी अधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीने घेतली निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली.कोल्हापूर खंडपीठाने या याचिकेबाबत निर्णय देताना
पूर्वी एकूण १३ सदस्य होते. तेव्हा कोरमसाठी ७ सदस्यांची उपस्थिती अनिवार्य होती. आता १८ सदस्य असल्याने कोरम पूर्ण करण्यासाठी १० सदस्यांची आवश्यकता असल्याच्या नियम ग्राह्य धरत न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली. तसेच तहकूब झालेली मिटींग नव्याने घेण्यात यावी,असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.ही बैठक उद्या रविवारी दुपारी साडेबारा वाजता होणार आहे अशी माहिती अध्यासी अधिकारी धनाजी काळे यांनी दिली.

