म्हसवड मध्ये महिलाराज अवतरणार
* राजकीय हालचालीं गतिमान
* पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार
- * म्हसवड नगरपालिका आता 23 हजार मतदारांच्या मुठीत
म्हसवड:भरारी वृत्तसेवा
म्हसवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण महिलांसाठी आहे. त्यातच आज प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर झाली.नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आली असून पक्षश्रेष्ठींकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा शोध सुरू आहे. काही प्रभागांमध्ये महिला आरक्षणामुळे नवे चेहरे राजकारणात झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी पुढील काही दिवसांत आरक्षणानुसार उमेदवारांची उमेदवारी निश्चित होणार असून, यानंतर म्हसवडच्या स्थानिक राजकारणात नवा रंग चढणार आहे.
२० प्रभागांपैकी १० महिला व १० पुरुषांसाठी आरक्षण — ८ प्रभाग आरक्षित, १२ सर्वसाधारण
म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (२०२५) सदस्यपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, या आरक्षणामुळे नगर राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. नगरपालिकेच्या २० प्रभागांपैकी १० प्रभाग महिला तर १० प्रभाग पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
या २० प्रभागांपैकी १२ प्रभाग सर्वसाधारण तर ८ प्रभाग हे आरक्षित आहेत. आरक्षित प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी ३ जागा तर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीच्या तीन पैकी दोन प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षण पडले असून, एक प्रभाग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गात तीन महिला व दोन पुरुष असे आरक्षण निश्चित झाले आहे.
सभागृहात पार पडली आरक्षण सोडत
म्हसवड नगरपरिषदेच्या सभागृहात ही आरक्षण सोडत पार पडली. या वेळी प्रांताधिकारी सौ. उज्वला गाडेकर आणि मुख्याधिकारी डॉ. सचिन माने उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोडतीची चिठ्ठी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली, ज्यामुळे पारदर्शकतेचा आणि लोकशाही परंपरेचा आदर्श दाखविण्यात आला.
- प्रभागनिहाय मतदारसंख्या व परिसर
एकूण दहा प्रभागांमध्ये २३,३५८ मतदार नोंदले गेले असून, त्यात विविध समाजघटकांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक १:
एकूण मतदार – २,५३३, अनुसूचित जाती – ६०९.
या प्रभागात शेटे वस्ती, पोलीस स्टेशन, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उद्यमनगर (१), पिसे वस्ती आणि कारंडे वस्ती यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक २:
एकूण मतदार – २,३६५, अनुसूचित जाती – ४०४.
मासाळवाडी परिसर, लोखंडे वस्ती, ढोक मोडा, बोंबाळे वस्ती, मानेवाडी, राऊतवाडी इत्यादी भागांचा समावेश.
प्रभाग क्रमांक ३:
एकूण मतदार – २,४४९, अनुसूचित जाती – ८२८.
भांदुर्गे वस्ती, कलढोणे वस्ती, नारायण सरतापे वस्ती, कोल्हे वस्ती, शेरी मळा, बेगर वस्ती, हिंगणी रस्ता, माळावरील मातंग वसाहत, वाक वस्ती आणि खरा मळा.
प्रभाग क्रमांक ४:
एकूण मतदार – २,३०८, अनुसूचित जाती – ७६८.
मणेरबोळ, नेहरू पथ, भंडारेबोळ, मोमीन गल्ली, चांभार गल्ली, लोटके वस्ती, यात्रा मैदान परिसर, काजीमळा, बनसोडे वसाहत, उद्यमनगर या भागांचा समावेश.
प्रभाग क्रमांक ५:
एकूण मतदार – २,२५१, अनुसूचित जाती – १२.
रामोशी गल्ली, जनावरांचा दवाखाना, गोपी कॉर्नर, सिद्धनाथ पथ, चौंडेश्वरी मंदिर, कोष्टी गल्ली, खंडोबा मंदिर परिसर, मेत्रे वाडा, माळी गल्ली, पिंजारी परिसर.
प्रभाग क्रमांक ६:
एकूण मतदार – २,६१८, अनुसूचित जाती – ८३, अनुसूचित जमाती – ३२.
सिद्धनाथ हायस्कूल परिसर, मासाळ टेक, त्रिगुणी बोर्ड, महात्मा गांधी पथ, मोडाचे हॉस्पिटल ते कासारबोळ, राजवाडा, नाभी गल्ली, सुतार गल्ली, सिद्धनाथ मंदिर परिसर.
प्रभाग क्रमांक ७:
एकूण मतदार – २४० (संख्या अपूर्ण), अनुसूचित जाती – १२०, अनुसूचित जमाती – २०.
सोसायटी हाऊसिंग सोसायटी, सूर्यवंशी वस्ती, चोपडे वस्ती, एस.टी. स्टँड, श्रीराम मंदिर परिसर, जुनी नगरपरिषद, बाजार पटांगण, जुने पोस्ट ऑफिस परिसर.
प्रभाग क्रमांक ८:
(मतदारसंख्या अपूर्ण)
शेंबडे वस्ती, खांडेकर वस्ती, काळा पट्टा, तावशे वस्ती, पवार वस्ती, पंतवाडी परिसर यांचा समावेश.
प्रभाग क्रमांक ९:
एकूण मतदार – २,२८६, अनुसूचित जाती – ७३, अनुसूचित जमाती – ५.
मसाईवाडी परिसर, नागोबा मंदिर परिसर, कबीर वस्ती, बोरे वस्ती, गुरव वस्ती, दहिवडे मळा, बिरोबा मंदिर, झगडे वस्ती, कवठे वस्ती, मेगासिटी, बनगरवाडी.
प्रभाग क्रमांक १०:
एकूण मतदार – २,४८९, अनुसूचित जाती – २४५, अनुसूचित जमाती – २.
खासबाग वस्ती, राखुंडे वस्ती, जठारे वस्ती, शिंदे वस्ती, बेघर वसाहत, खोत गल्ली, विरकरवाडी परिसर. यांचा समावेश आहे..
