
पाणी योजनांचे भगीरथ,
जनतेचा विश्वास विकासाची दिशा म्हणजेच नामदार जयकुमार गोरे
भरारी वृत्तसेवा (संपादक:राजेश इनामदार)
( ना जयकुमार गोरे वाढदिवस विशेष लेख)
माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार आणि राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.जयकुमार गोरे यांचा वाढदिवस बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी साजरा होत असून,त्यांच्या विकासकामांचा व जनसंपर्काच्या कार्यपद्धतीचा आज जनतेत जयजयकार होत आहे. ग्रामीण भागाच्या पायाभूत विकासासाठी आणि पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आज संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरत आहेत.दुष्काळी म्हणून माण खटाव चा कलंक पुसण्याचे काम त्यांनी केले.त्यामुळेच त्यांना माण व खटाव तालुक्याचे भगीरथ,जलनायक,विकासपुरुष म्हणून नवीन ओळख मिळत आहे.
पाणीप्रश्न सोडविण्यात पुढाकार
माण व खटाव या दोन्ही तालुक्यातील दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून ना. जयकुमार गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करत उरमोडी व जीहे कठापूर जलयोजना कार्यान्वित करण्याचे काम करून माण खटाव च्या विकासाला नवी दिशा दिली आहे
या योजनांमुळे शेकडो गावे आणि हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून,शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. दोन्ही तालुक्यांतील पाणीपुरवठ्याचा चेहरामोहरा या योजनांमुळे पूर्णपणे बदलला आहे. गावागावांत पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचविण्याची कामे त्यांच्या पाठपुराव्यामुळे जलद गतीने पूर्ण झाली.तसेच नव्याने अनेक गावांना पाणी मिळाले असल्याने शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शेतीला पाणी मिळाले.त्यामुळे आता शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबू लागले आहे.तसेच पाण्याअभावी व चाऱ्या अभावी जनावरे विकावी लागणार नाहीत.शेतकरी आता हळूहळू समृद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. काही भागात जिथं कुसळ दिसत होती तेथे आता ऊस डौलताना दिसत आहे.हा बदल नक्कीच सुखावह आहे.ना.गोरे यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर नक्कीच उंचावू लागला आहे.
ग्रामीण विकासावर भर
जयकुमार गोरे यांनी आपल्या कार्यकाळात पाणी योजनांच्या कामांना महत्व देतानाच रस्ते,शाळा,आरोग्य सेवा,सिंचन योजना आणि महिलांच्या स्वावलंबनावर विशेष भर दिला.ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी त्यांनी पंचायतराज मंत्रालयाच्या माध्यमातून निधीवाटपात पारदर्शकता आणली.
गावांच्या विकास आराखड्याला स्थानिकांचा सहभाग मिळावा, यासाठी त्यांनी “गावाचे सरकार गावातच” ही संकल्पना बळकट केली. या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी पणे सुरू झाले आहे.त्यामुळे खेड्यांचा विकास होण्यास व गावे स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान हे “मैलाचा दगड” ठरणार आहे. या कामामुळे नामदार जयकुमार गोरे भविष्यात राज्यातील विकास पुरुष म्हणून ओळखले जातील यात शंका नाही.स्वयंपूर्ण खेडी निर्माण झाली तर शहरातील गर्दी कमी होईल.ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळेल.
जनतेचा नेता,सर्वांचा आपला माणूस
सहज स्वभाव, लोकांशी थेट संवाद आणि कार्यात सातत्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतानाही त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांकडे विशेष लक्ष दिले आहे. तसेच ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागाचा दौरा करून तेथील शेतकऱ्यांना व गरजू लोकांना शासनाकडून मदतीचा हात देण्याचे मोठं काम त्यांच्या हातून घडले आहे.
ग्रामीण विकासाचा चेहरा.. नवी ओळख
विकासाच्या वाटचालीत जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेले मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागाचा “विकासाचा चेहरा” म्हणून ओळख मिळाली आहे.
जयकुमार गोरे यांच्या कार्यशैलीने माण-खटाव परिसरात विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे. खोडोपाड्यात त्यांनी
पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पुरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत हजारो कोटींचा निधी माण व खटाव तालुक्यात आणला व जिद्दीने जीहे कठापूर,उरमोडी या योजना पूर्ण केल्या.त्यामुळे माण तालुक्यातील दुष्काळ हटण्यास मोठी मदत झाली आहे. ना जयकुमार गोरे यांच्या अतोनात मेहनतीने माण व खटाव तालुक्यांचा दुष्काळी हा कलंक कायमस्वरूपी पुसला जातोय.ही मोठी बाब आहे. पाण्यासाठीची जिद्द बघितली असल्यामुळे त्यांच्या एकूणच कर्तृत्वाला मनापासून सलाम करून त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना “भरारी वृत्तसेवा” परिवारातर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!
