
- वरकुटे येथे गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पकडले
म्हसवड: भरारी वृत्तसेवा (संपादक राजेश इनामदार)
म्हसवड जवळील वरकुटे या गावात गांजाची शेती करून १० लाख रुपये किंमतीचा ४० किलो गांजा जोपासणाऱ्या शेतकऱ्याला सातारा येथील
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई करून संबंधित शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.म्हसवड चे सपोनी अक्षय सोनवणे हे अधिक तपास करत आहेत.याबाबत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या कार्यालयातून व म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी,
स्थानिक गुन्हे शाखा सातारा पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या खास बातमी दारामार्फत माहिती मिळाल्यावर तुपेवाडी, वरकुटे (ता. माण जि. सातारा) गावच्या हददीत संशयित आरोपी शहाजी दाजी तुपे (वय ६५ वर्षे रा. तुपेवाडी, वरकुटे ता. माण जि. सातारा) यांनी त्याच्या शेतामध्ये अंमली पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांजा च्या झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने, काल गुरवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनी विश्वास शिंगाडे व काही पोलीस अंमलदार तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनावणे व पोलीस अंमलदार यांचे पथक असे यांनी संयुक्तपणे संबंधित ठिकाणी जावुन छापा टाकला असता, शहाजी दाजी तुपे (वय ६५ वर्षे रा. तुपेवाडी वरकुटे ता. माण जि. सातारा) यांच्या मालकीच्या शेतात एकुण ४० गांजाच्या झाडांची विक्रीच्या उद्देशाने लागवड केली असल्याचे निदर्शनास आले, सदर ठिकाणी एकूण 40 किलो 500 ग्रॅम वजनाचा 10 लाख 12 रुपये किंमतीचा ओला गांजाची लागवड केलेली झाडे, गांजाची हिरवट पाने फुले, बारीक काडया व बीज असलेली ओलसर पाने सुकत घातल्याचे मिळुन आले, म्हणुन त्यांच्या विरुध्द म्हसवड पोलीस गुन्हा दाखल करणेत आला आहे.श्री. तुषार दोषी, पोलीस अधीक्षक, सातारा, डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी कारवाई पथक मधील स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडील अरुण देवकर पोलीस निरीक्षक,रोहित फाणें सपोनि, विश्वास शिंगाडे पोउनि, परितोष दातीर,म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनावने, पी एस आय अनिल वाघमोडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अतिश घाडगे,शिवाजी गुरव, सचिन साळुंखे सनी आवटे, अमित सपकाळ, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, धिरज महाडीक,म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अमर नारनवर,शशिकांत खाडे, रुपाली फडतरे, डाहाले, राहुल थोरात, वसिम मुलानी व फॉरंन्सीक टीम यांनी कारवाई केली आहे.
आरोपीस चार दिवस पोलीस कोठडी
संबंधित आरोपीस आज म्हसवड न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने चार दिवस
पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे.अशी माहिती म्हसवड चे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली.
