नैरोबीत भारतीय जोडीची चमक; दुहेरीत उपविजेतेपदाला गवसणी घालत मिळवले सिल्वर मेडल
जागतिक स्तरावर भारतीय टेनिसची छाप; अरमानी-गुरलीन जोडीचा उल्लेखनीय पराक्रम
केनियातील स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी, देशाचा मान उंचावला
दहिवडी:भरारी वृत्तसेवा
नैरोबी (केनिया) येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या अरमानी रुपेश नलावडे आणि गुरलीन कौर या जोडीने दुहेरी गटात उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. तसेच युगांडा येथे झालेल्या टेनिस स्पर्धेत ही भारताच्या अरमानी रुपेश नलावडे हिने मिश्र दुहेरी टेनिस स्पर्धेत ही उपविजेते पद मिळवून भारताला सिल्वर पदक मिळवून दिले. माण च्या या कन्येने दोन सिल्वर मेडल भारताला मिळवून देत देशाची,राज्याची,जिल्ह्याची व माण तालुक्याची मान अभिमानाने उंचावली.
अरमानी नलावडे ही माण तालुक्यातील बोथे गावची कन्या असून मुंबई येथील हायकोर्ट येथे वकिली
करणाऱ्या ॲड रुपेश नलावडे यांची कन्या आहे.
करणाऱ्या ॲड रुपेश नलावडे यांची कन्या आहे. अठरा वर्षाखालील टेनिस स्पर्धेत भारतीय महिला जोडीने स्पर्धेतील प्रत्येक फेरीत दमदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्य फेरीत त्यांनी स्वित्झर्लंडच्या क्लोई वांग आणि रशियाच्या एलिझाव्हेटा प्रिलोव्हा यांच्या जोडीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
अंतिम सामन्यात अरमानी आणि गुरलीन यांना केनियाच्या स्टेसी येगो आणि रशियाच्या मिलाना कोलेसोवा यांच्या जोडीविरुद्ध चुरशीच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला. मात्र, संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि दर्जेदार खेळ करत भारतीय जोडीने उपविजेतेपद मिळवून देशाचा मान उंचावला.
या उल्लेखनीय यशाबद्दल अरमानी रुपेश नलावडे आणि गुरलीन कौर यांचे क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.युगांडा येथे झालेल्या स्पर्धेत ही भारताच्या अरमानी रुपेश नलावडे हिने मिश्र दुहेरी टेनिस स्पर्धेत ही उपविजेते पद मिळवून भारताला सिल्वर पदक मिळवून दिले.भारताला दोन सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या अरमानी चे सर्वत्र कौतुक होत आहे.

