कर्तव्यनिष्ठ शिक्षणसेवेचा गौरव; विस्तार अधिकारी वर्षा गायकवाड यांचा शिक्षक संघाकडून सन्मा
दहिवडी भरारी वृत्तसेवा:
माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात फलटण पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ. वर्षा चंद्रकांत गायकवाड यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. येत्या ३१ मे रोजी त्या सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय शैक्षणिक सेवेला सलाम करत शिक्षक संघाने हा गौरव सोहळा आयोजित केला होता.
कार्यक्रमाला माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, दहिवडीच्या माजी नगराध्यक्ष साधना गुंडगे, खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, शमीम तांबोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती विक्रम शिंगाडे म्हणाले, “शिक्षक हा समाज परिवर्तनाचा शिल्पकार असतो. कर्तव्यनिष्ठ शिक्षक कधीच निवृत्त होत नाहीत. निवृत्तीनंतरही त्यांनी समाजाला मार्गदर्शन करून नवीन पिढीला दिशा देण्याचे कार्य सुरू ठेवावे.”
कार्यक्रमात बँक्स असोसिएशनचे संचालक महेंद्र अवघडे, सुगंधराव जगदाळे, हरीश गोरे, उषा जाधव, रेखा जगदाळे, शकुंतला नाईक तसेच ब्रह्मकुमारी प्रिया बहन यांनी मनोगत व्यक्त करत सौ. गायकवाड यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश माने यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम माने यांनी तर आभार प्रदर्शन विक्रांत गायकवाड यांनी केले.
यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बळीराम विरकर, सुभाष जगदाळे, हणमंतराव अवघडे, उमेश शेंडे, शिवाजी शिंगाडे, किशोर देवकर, रफीक मुलाणी, पुंडलिक खराडे, रामभाऊ खाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

