![]()
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विकासकामांचे गडकरींकडून कौतुक
पंढरपूर विकास आराखड्याची पाहणी; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सुविधांचा घेतला आढावापंढरपूर भरारी वृत्तसेवा
: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेत मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी पंढरपूर विकास आराखड्याचा आढावा घेताना सोलापूरचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांच्या कामाचे त्यांनी दिलखुलास कौतुक केले. मंदिर परिसरातील विकासकामे, भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा आणि व्यवस्थापनाच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करत गडकरी यांनी विकास आराखड्याचे अभिनंदन केले.
यावेळी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत राज्याच्या विकास, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच मंदिर परिसरातील विविध सुविधांची आणि सुरू असलेल्या व्यवस्थापन कामांची पाहणी करून सविस्तर आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच समिती सदस्यांच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि शाल देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूरचे आमदार मा. श्री. समाधान आवताडे, माजी आमदार मा. श्री. प्रशांत परिचारक, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रणव परिचारक, पंढरपूर शहराध्यक्ष रोहित पानकर, मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजीराजे शिंदे, माऊली भाऊ हळणवर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच पंढरपूर शहरातील नगरसेवक, पक्ष पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.


पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विकासकामांचे गडकरींकडून कौतुक